Posts

प्रेमळ राजू

01) कुत्र्याचे पिल्लू                 राजू शाळेतून घरी येत होता. त्याला रस्त्यावर एक छोटंसं कुत्र्याचे पिल्लू दिसलं. त्याच्या आसपास कोणीच नव्हतं. तो एकटाच होता, त्याची आईपण जवळ नव्हती. त्याला भूक लागली असेल असे राजूला वाटले. म्हणून त्याने दप्तरातील खाऊचा डबा काढला. त्यात एक-दोन बिस्कीट होते. दुपारच्या सुट्टीत खाल्ले नव्हते म्हणून शिल्लक होते. त्याने डब्यातून बिस्कीट काढला. त्या छोट्या कुत्र्याच्या पिल्लूला खायला दिला. ते खाल्यावर त्याला बरे वाटले. म्हणून तो रस्त्याच्या एका बाजूला जाऊन बसला. ते कुत्र्याचं पिल्लू खूपच सुंदर होतं.  गव्हाच्या रंगासारखं, गुबगुबीत नाकावर काळा रंग होता. म्हणूनच राजूला खूप आवडला होता. त्याला टाटा करून तो घरी आला. त्याच्या मनात त्या पिल्लाने घर केले होते. त्याचे मन कुठेही लागत नव्हते. रात्रीला त्याला झोप लागली नाही. सकाळ कधी होते ? त्या कुत्र्याच्या पिल्लूला कधी एकदा भेटतो ? असे त्याला झाले होते. दुसऱ्या दिवशी तो लवकरच तयार झाला. आज खाऊच्या डब्यात चार बिस्किटे जास्तच घेतली. तेव्हा आई त्याला म्हणाली, " राजू, नुसते बिस्...

पैसासम्राट (Paisa-Samrat)

पैसासम्राट प्रसिद्ध उद्योगपती लक्ष्मीकांत यांचे दवाखान्यात निधन, त्यांच्यावर अंतिम संस्कार कोण करणार ? अशी एक ठळक बातमी वृत्तपत्रात आणि सोशल मीडियामध्ये झळकली. तशी ती बातमी गणेशच्या कानावर देखील गेली. तसा तो काही वेळासाठी हादरला. क्षणाचाही विलंब न लावता तो थेट त्या दवाखान्याकडे धाव घेतली ज्याठिकाणी लक्ष्मीकांतने आपला शेवटचा श्वास घेतला होता. लक्ष्मीकांत हा प्रसिद्ध उद्योगपती आणि देशातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या यादीत पहिल्या पाच मध्ये असणारा व्यक्ती. पण मृत्यूच्या वेळी त्याच्याजवळ कोणीही उपस्थित नव्हते. त्या शहरात गणेश हा एकटाच असा जिवलग मित्र होता जो की कुटुंबातील एक सदस्याप्रमाणे होता. हृदयविकाराचा झटका आला म्हणून त्याला शहरातील नामवंत दवाखान्यात भरती करण्यात आले होते. पैश्याची काही कमतरता नव्हती, डॉक्टरांनी देखील खूप प्रयत्न केला पण लक्ष्मीकांतचा जीव ते वाचवू शकले नाहीत. गणेश दवाखान्यात पोहोचला आणि तेथील परिस्थिती जाणून घेतली. लक्ष्मीकांतला दोन मुले होती आणि दोन्ही मुले परदेशात होती. गणेशने दोन्ही मुलांना लक्ष्मीकांतच्या जाण्याची बातमी कळवली पण दोघांनी देखील भारतात येण्यास असमर्थत...

मेहनतीचे फळ ( Value of Hardwork )

Image
        लघुकथा - मेहनतीचे फळ दिवाळीच्या सुट्टी निमित्ताने सुरेश गावी जाण्यास निघाला होता. सकाळीच पुण्यावरून आलेल्या बसने तो उतरला आणि गावाकडून येणाऱ्या व्यक्तीची वाट बघत बसस्थानकावर थांबला होता. त्याच बस स्थानकावर थोड्या अंतरावर एक व्यक्ती आपल्या सामानसह उभा असलेला सुरेशने पाहिलं आणि ती व्यक्ती त्याला ओळखीची वाटत होती. म्हणून तो जास्तच निरखून पाहू लागला. थोड्या वेळाने त्या व्यक्तीची नजर देखील सुरेशवर पडली आणि दोघांची नजरानजर झाली. क्षणाचा विलंब न लावता सुरेशने " मनोज, ए मनोज, तू मनोज आहेस ना ! " असे म्हणाला. त्यावर पुढील व्यक्ती देखील, " होय मी मनोज आहे, तू सुरेश ना ! " सुरेश ने देखील प्रत्युत्तरमध्ये होय म्हटलं. त्यांच्या गप्पा झाल्या. ते दोघे एकाच शाळेत शिकलेले, एकाच वर्गातले एकत्र शाळेला ये-जा करणारे आणि एकत्र डबा खाणारे, जिवलग मित्र. त्यामुळे एकमेकांना ओळखण्यात जास्त वेळ गेला नाही. सुरेशने विचारलं, " मनोज सध्या कुठं आहेस ? काय करतोस ?" यावर मनोज म्हणाला, " मी सी आर पी एफ मध्ये आहे आणि तू काय करतोस ? " यावर सुरेश म्हणाला, " मी...

Diwali ( दिवाळी )

Image
दिवाळी     - नासा येवतीकर, धर्माबाद घरात लक्ष्मीपूजन करण्याची लगबग सकाळ पासून सुरु झाली होती. आई भल्या पहाटे उठली आणि घरासमोर अंगण स्वच्छ झाडून सडा टाकली तर ताईने खूप छान रांगोळी काढली. बाबा देखील सकाळी लवकरच उठून शेताकडे जाऊन काही झेंडूची फुलं आणि आंब्याची डहाळी आणली होती. आम्ही भावंडे अजूनही झोपेतच होतो. शाळेच्या दिवसांत रोज सकाळी लवकर उठून तयार व्हावे लागते म्हणून दिवाळीच्या सुट्टीत मनसोक्त झोप घ्यावी असा मनसुबा असतो पण आई कुठे झोपू देते. तिचे काम सरले की तिचा मोर्चा आमच्याकडे वळला. उठा उठा सकाळ झाली म्हणत ती आम्हांला सर्वाना उठवली. डोळे चोळत चोळत आम्ही सारेजण उठलो. तोंडात ब्रश कोंबलो. लगेच अंघोळीची देखील तयारी झालेली होती. घराच्या मागच्या बाजूला लाकडी चूल होती. त्याच्यावर एका मोठ्या पातेल्यात पाणी गरम करायला ठेवलं होतं. सकाळचा गार वारा अंगाला झोम्बत होता. अश्या थंडीत मस्त गरम पांघरून घेऊन झोपावं वाटतं आणि आईने आंघोळी साठी घाई केलेली अजिबात आवडत नव्हतं. पण नाईलाज होता. आई कोणाचेच ऐकत नसे. सर्व भावंडांना तिने अंगभर उटणे घासले आणि सर्वाना एकदाच आंघोळीसाठी र...

EK Tarikh ..... ( एक तारीख .....)

लघुकथा - एक तारीख शंकर एका सरकारी कार्यालयात कारकून पदावर काम करणारा सामान्य व्यक्ती. गौरी त्याची बायको, साधी आणि भोळी. दिसायला सुंदर जरी नसेल तरी नजरेत भरण्यासारखी तिचे डोळे व नाक अनेकांचे लक्ष आकर्षित करणारी होती. ती ग्रामीण भागातील राहणारी आणि जेमतेम सातवी पास झालेली सोज्वळ आणि मनमिळाऊ स्वभावाची होती. ते दोघेही महादेवाचे खूप मोठे भक्त होते. दर सोमवारी महादेवाच्या नावाने उपवास ठेवत असत. त्यांना गणेश आणि कीर्ती असे दोन लेकरं होते, जे की शंकर-गौरीप्रमाणे सुरेख होते. त्यांचा सुखाचा असा संसार होता. ना कोणाची कटकट ना कोणाची झिकझिक. महिन्याच्या एक तारखेला पगार झाला की शंकर घरी परत येत असताना बायकोसाठी गजरा घ्यायचा, लेकरांसाठी काही तरी खाऊ घ्यायचा आणि स्वतःसाठी औषध म्हणजे दारूची एक बॉटल घ्यायचा. असे फक्त एक तारखेला पगाराच्या दिवशी घडायचं. इतर दिवशी तो घरी काहीच न्यायचा नाही. तसा त्याचा कारकूनचा पगार खूप कमी, त्यात शहरात भाड्याने घर घेऊन राहणं आणि त्यात मुलांना खाजगी शाळा व शिकवणी म्हणजे सारं काही खर्चिक होतं. शिवाय त्याला अन्य कोणताच आधार नव्हता शिवाय पगाराच्या. म्हणून तो महिन्यातून एकदाच ...

पंगूम लंगयते गिरीम

Image
जागतिक अपंग दिनानिमित्त लघुकथा पंगूम लंगयते गिरीम देवाचिये द्वारीं उभा क्षणभरी ।  तेणें मुक्ति चारी साधियेल्या ॥१॥  हरि मुखें म्हणा हरि मुखें म्हणा।  पुण्याची गणना कोण करी ॥  मंदिराच्या माईकवरून रोज सायंकाळी हरिपाठ सर्वजण ऐकत असत. त्या आवाजात अशी काही जादू होती की, हरिपाठ चालू झाला की सारेचजण ते ऐकण्यात गुंग होऊन जात असत. कारण ही तसेच होते त्याच गावातील विठ्ठल नावाचा एक हरिभक्त रोज सायंकाळी न चुकता हरिपाठाचे गायन करत असतो. गावातील लोकांना त्याचे विशेष कौतुक का वाटत होते तर तो विठ्ठल दोन्ही डोळ्याने आंधळा होता. त्याने कधी शाळेचे तोंड देखील पाहिलं नाही तरी संपूर्ण हरिपाठ अगदी तोंडपाठ म्हणतो. नुसतं हरिपाठच नाही तर अनेक अभंग आणि ओव्या त्याला तोंडपाठ होत्या. त्यामुळे नेहमी तो विठ्ठलाचे गुणगान करण्यात तल्लीन राहत असे. रोज पाच घरी माधुकरी मागून मिळेल ते अन्न खाऊन तो आपला जीवन आनंदात जगत होता. त्याला कोणत्याच गोष्टीची आस नव्हती, मनात कुठला स्वार्थ नव्हता. उद्याच्या जगण्याची त्याला अजिबात काळजी नव्हती. ज्याने जन्म दिला त्याला आपली काळजी आहे, आपण उगीच का काळज...

उन्हाळ्यात काळजी घ्यावी

Image
उन्हाळ्यात घेऊ या काळजी  मागील तीन दिवसांपासून कमाल तापमान वाढत असून सध्या पारा थेट ३८-४० अंशापर्यंत सरकल्याने नागरिकांच्या अंगाची काहिली होत आहे. दुपारी एक वाजेपासून चार वाजेपर्यंत उन्हाचा तीव्र तडाखा जाणवू लागत आहे. त्यामुळे प्रत्येकांनी उन्हात बाहेर न पडता घरात किंवा ज्याठिकाणी सावली आहे अश्या ठिकाणी विश्रांती करणे आवश्यक आहे. अत्यंत आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे अन्यथा घरात थांबलेलेच बरे राहील. कारण अश्या तीव्र उन्हामुळे उष्माघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. उन्हात बाहेर निघताना छत्री, पांढरा रुमाल सोबत असणे आवश्यक आहे. लहान मुलांना शक्यतो बाहेर घेऊन जाणे टाळावे. शाळेत जाणारी मुले 12 च्या आत घरात येतील असे वेळापत्रक तयार करावे. शालेय मुलांनी स्वतः आजारी पडणार नाही याची काळजी जरूर घ्यावी. बाहेर पडताना सोबत थोडे पाणी नेहमी असू द्यावे कारण या वातावरणात आपल्या शरीरातील पाणी कमी त्यामुळे डीहायड्रेशन होण्याची शक्यता असते. त्याचसोबत जास्तीत जास्त पाणी पीत राहावे. या काळात शक्यतो फ्रीजमधील पाणी पिणे टाळावे. त्यापेक्षा नैसर्गिक थंड पाणी करून पाणी पीत राहावे. दुपारच्य...