Posts

स्वातंत्र्य दिन ( Indispens Day )

Image
विचार बदला, देश बदलेल आज 15 ऑगस्ट 2025 रोजी भारताचा 79 वा स्वातंत्र्य दिन. ह्या सोनेरी दिवसाची पहाट पाहण्यासाठी कित्येक लोकांना आपले प्राण गमवावे लागले. आजच्या दिवशी आपण ह्या सर्व थोर क्रांतिकारक आणि महात्मा मंडळीची आठवण करतो. " भारतमाता की जय " असा नारा देतांना त्या छोट्याशा शिरीषकुमारची आठवण आल्याशिवाय राहत नाही. तो शाळकरी वयाचा म्हणजे जेमतेम 10 वर्षाचा होता. इंग्रजांचा विरोधात नारे दिल्यामुळे आणि भारतमातेची सेवा केल्यामुळे त्याला इंग्रजांनी ठार केले. परदेशी कपड्यांच्या गाडीसमोर स्वतःचे बलिदान करणारे बाबू गेनूला आपण कसे विसरू. शिरीषकुमार व बाबू गेनू आज आपल्यात नाहीत परंतु त्याच्या आठवणी, त्याचे कार्य अजूनही स्मरणात आहे. आपण ते कधीच विसरु शकत नाही.  भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या काळात लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, नेताजी सुभाषचंद्र बोस, मौलाना अबुल कलाम आझाद, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर सावरकर इत्यादी अनेक जणांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी चळवळ उभी केली व देशाला गुलामगिरीतून मुक्त केले. त्यापूर्वी महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाईं फुले यां...

जागतिक जल दिवस (World Water Day )

Image
22 मार्च - जागतिक जल दिन त्यानिमित्ताने लेख                जल है तो कल है  पाणी म्हणजे जल किंवा नीर असे ही म्हटले जाते. सजीवांना त्यांच्या वाढीसाठी आणि विकासासाठी पाण्याची नितांत आवश्यकता असते. त्याशिवाय कोणताही सजीव जिवंत राहूच शकत नाही. पशु-पक्षी, वेली, वनस्पती, झाडे, आणि मानवाना पदोपदी पाण्याची गरज भासते. अश्मयुगीन काळातील लोकं पाण्याचे ठिकाण पाहून आपली वस्ती तयार करत होते. कारण त्याशिवाय त्यांचे जगणे अशक्य होते. आज ही आपली तीच परिस्थिती आहे. शहरात किंवा खेड्यात कोठेही घर बांधण्यापूर्वी पाण्याची व्यवस्था कशी आहे ? याबाबी लक्षात घेतले जाते. त्यानंतरच घर बांधणीचा विचार केला जातो. एखाद्या ठिकाणी पाणी उपलब्ध नाही म्हटल्यावर तेथे सहसा कोणी घर बांधकाम करत नाहीत, त्या भागातील जमिनीचे दर देखील खूप कमी असतात. वाढती लोकसंख्या आणि वाढते घरं यामुळे प्रत्येकजण पाण्याची व्यवस्था करण्यासाठी जमिनीला चारशे ते पाचशे फूट खाली पर्यंत छिद्र करत आहेत. त्यामुळे जमिनीचे अक्षरशः चाळणी झाल्यासारखी अवस्था झाली आहे. पूर्वीच्या काळी पन्नास फूट खोलीवर असणार...

देविदास नारमोड ( Devidas Narmod )

Image
कर्तव्याशी प्रामाणिक असलेले देविदास नारमोड प्रत्येक सरकारी कर्मचाऱ्यांच्या जीवनात सेवानिवृत्तीचा दिवस येतोच येतो. नियत वयोमानानुसार 58 वर्षे पूर्ण झाल्यानंतर सेवेतून कार्यमुक्त होणे प्रत्येक कर्मचाऱ्यांना गरजेचे असते. त्याच नियमानुसार आज पंचायत समिती उमरी येथील सिंधी बिट चे शिक्षण विस्तार अधिकारी देविदास नारमोड हे आपल्या वयाची 58 वर्षे पूर्ण केल्यामुळे सेवानिवृत्त होत आहेत. त्यानिमित्ताने त्यांच्या शैक्षणिक कार्याचा थोडक्यात आढावा.  धर्माबाद तालुक्यातील गोदावरी नदीच्या काठावर वसलेल्या पाटोदा खु. येथे देविदास नारमोड यांचा जन्म 07 फेब्रुवारी 1967 रोजी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव गणपतराव तर आईचे नाव गंगाबाई असे आहे. त्यांच्या घरची परिस्थिती अत्यंत बिकट होती. आई-वडील शेती काम करत होते. त्यांचे पहिली ते चौथीपर्यंतचे प्राथमिक शिक्षण गावातील शाळेत पूर्ण झाले. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी ते बिलोलीच्या आत्याबाईकडे राहून पाचवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण जिल्हा परिषद हायस्कुल बिलोली येथे पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी शिक्षणशास्त्र पदविका म्हणजे डी. एड. शिकण्याचा निर्णय घेतला. धर्माबाद...

कादंबरी - लक्ष्मी

Image
कादंबरी - लक्ष्मी प्रस्तावना -  कोरोना विषाणूने जगभर थैमान घातलेला असताना इथे घरात बसून मनाची ही घालमेल चालू झाली होती. सुरुवातीला काही दिवस आनंदात गेले पण लॉकडाऊनचा काळ वाढू लागला तसा मनाची बेचैनी देखील वाढू लागली. दिवसभर घरात बसून काय करावं ? या प्रश्नाचे उत्तर शोधताना अनेक पर्याय डोळ्यासमोर उभे होते. टीव्ही पाहणे, चित्रपट पाहणे, गाणी ऐकणे, जुन्या संग्रहातील फोटो अल्बम पाहणे, फोनवर गप्पा मारणे आणि पुस्तकाचे वाचन-लेखन करणे. अश्या अनेक पर्यायातून पुस्तक वाचण्याचा पर्याय निवडला. जून महिन्यात लक्ष्मीबाई टिळक लिखित स्मृतिचित्रे हे साडे पाचशे पानांचे पुस्तक रोज थोडे थोडे वाचून पूर्ण केलो. या पुस्तकातील नारायण वामन टिळक यांची पत्नी लक्ष्मीबाई ही लग्नाच्या वेळी निरक्षर होती. पण नारायणराव यांनी तिला साक्षर केले, नुसते साक्षर केले नाही तर तिच्या हातून साहित्य निर्मिती करून घेतली. याच लक्ष्मीबाईचा प्रभाव माझ्यावर पडला आणि मला एक कथा बीज सापडले. मुलींच्या शिक्षणाचे महत्त्व समाजाला कथेच्या माध्यमातून सांगावं तसेच या लॉकडाऊन काळातील वेळेचा सदुपयोग व्हावा म्हणून दिनांक 01 जुलै रोजी...

वाऱ्याची मुलगी

 ....... वाऱ्याची मुलगी राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धेत प्रथम आलेल्या पी टी निशाचे पोलीस उपनिरीक्षक पदी निवड ही ठळक बातमी वाचून ठाकूर सरांना खूप आनंद झाला. त्यांच्या डोळ्यातून आनंदाचे अश्रू नकळत टपकले. या बातमीने त्यांना  दहा पंधरा वर्षांपूर्वीचा काळ आठवला. ज्यावेळी ते एका प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून काम करत होते. निशा त्यावेळी चौथ्या वर्गात होती. काळी सावळी, वर्गाच्या मानाने जराशी उंच आणि सडपातळ शरीरयष्टी असलेली मुलगी म्हणजे निशा. घरची परिस्थिती खूपच बेताची. आई-वडील दोघेही  मोलमजुरी करून चार लेकरांची पोटे भरायची. त्यात निशा दुसऱ्या क्रमांकाची. पायात चप्पल नको ना अंगावर चांगले कपडे, अशी तिची विदारक स्थिती होती. ती अभ्यासात जेमतेम होती. कारण काही ना काही कारणाने ती शाळेला येऊ शकत नसे. एके दिवशी ठाकूर सरांनी खेळ घेण्याचे ठरविले. सर्व मुलांना मैदानात घेऊन गेले. धावणे या खेळाने सुरुवात झाली. निशाची रनिंग पाहून ठाकूर सर अचंबित झाले. कारण ती वाऱ्याच्या वेगाने धावत होती. तिच्या पायात चप्पल नव्हते ना बूट, जमिनीत दगड, गोटे, काटे टोचतील याची तिला अजिबात पर्वा नव्हती. सरांसोबत ती रोज ...