Posts

Showing posts from June, 2020

P T Nisha

पी टी निशा राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धेत प्रथम आलेल्या पी टी निशाचे पोलीस उपनिरीक्षक पदी निवड ही ठळक बातमी वाचून ठाकूर सरांना खूप आनंद झाला. त्यांच्या डोळ्यातून आनंदाचे दोन अश्रू नकळत टपकले. या बातमीने त्यांना  दहा पंधरा वर्षांपूर्वीचा काळ आठवला. ज्यावेळी ते एका प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून काम करत होते. निशा त्यावेळी चौथ्या वर्गात होती. काळी सावळी, वर्गाच्या मानाने जराशी उंच आणि सडपातळ शरीरयष्टी असलेली मुलगी म्हणजे निशा. घरची परिस्थिती खूपच बेताची. आई-वडील दोघे ही शेतात मजुरी करायचे आणि घरातील चार लेकरांची पोटे भरायची. त्यात निशा दुसऱ्या क्रमांकावरची मुलगी. पायात चप्पल नको ना अंगावर चांगले कपडे अशी तिची विदारक स्थिती होती. ती अभ्यासात जेमतेमच होती कारण बहुतांशवेळा काही ना काही कारणाने ती शाळेला डुम्मा मारत होती. एके दिवशी ठाकूर सरांनी दुपारच्या वेळी खेळ घ्यावे म्हणून सर्व मुलांना मैदानात घेऊन गेले. रनिंग या खेळाने सुरुवात झाली. निशाची रनिंग पाहून ठाकूर सर अचंबित झाले. कारण ती वाऱ्याच्या वेगाने धावत होती. तिच्या पायात चप्पल नव्हते ना बूट, जमिनीत दगड,गोटे, काटे चुभतील याची तिला अजिबा...

लघुकथा - संशयाचा बळी

संशयाचा बळी राजाने घरातल्या पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली ही बातमी गावात पसरायला वेळ लागली नाही. राजा आणि अनुसया आपल्या दोन लेकरासह गावाजवळच्या शहरात किरयाच्या खोलीत राहत होते. त्यांच्या दोघात काही वाद झाला नाही, ते गुण्या गोविंदाने राहत होते तरी राजाने आत्महत्या का केली ? याबाबत संपूर्ण गावकरी हैराण झाले होते. पाच वर्षांपूर्वी राजाराम आणि अनुसया यांचं लग्न झालं होतं तो लग्न नसून लव्ह मॅरेज होतं असे म्हटले तरी काही चुकीचे नव्हते. राजाराम शहरातल्या किराणा दुकानात काम करत होता. तर त्याच्याच शेजारी राहणारी अनुसया नुकतीच बारावीची परीक्षा पास होऊन शहरातील कॉलेजमध्ये पदवीला प्रवेश घेतली होती. अनुसया दिसायला खूप सुंदर होती. तसेच आठराव्या आणि एकोणिसाव्या वर्षात तर ती अजूनच सुंदर दिसू लागली. तशी राजाराम रोज तिच्याकडे टक लावून पाहत असे. राजा सायकलवर शहरात जायचा तर अनुसया बसने जायची. मधल्या सुट्टीत राजा कॉलेजमध्ये चक्कर मारायचा, ती दृष्टीस पडेपर्यंत थांबायचा, दोघांची नजरानजर झाली की मग परत आपल्या कामावर जायचा. एकदा कॉलेजमधील काही टवाळकी पोरं अनुसयाला सतावीत असताना राजाने सोडवणूक केली मग का...

लघुकथा - पाथरवट

लघुकथा - पाथरवट निळे सर पाचव्या वर्गात हजेरी घेत होते. राजू मोघे हे नाव घेतल्यावर क्षणभर थांबले. शाळा सुरू झाल्यापासून हा विद्यार्थी शाळेत आला नाही हे त्यांच्या लक्षात आले. गेल्यावर्षी तो नियमित शाळेत येत होता पण यावर्षी तो एकही दिवस शाळेत का आला नाही यावर सर विचार करू लागले. निळे सर बालरक्षक म्हणून काम पाहत होते. राजू शाळाबाह्य होऊ नये याची चिंता त्यांना सतावत होती म्हणून सर मुलांना विचारू लागले, " अरे हा राजू गावात आहे की नाही. ? " मुलांनी एकच कल्लोळ करीत म्हणाले " आहे सर, तो रोज निसर्ग हॉटेलात काम करतो, तेथेच खातो आणि रात्री उशिरा आपल्या घरी येतो. " पोरांना राजू बाबत हे सारं माहीत होतं. त्याच्या घरी जाऊन काही फायदा नाही म्हणून निळे सर मुख्याध्यापकांची परवानगी घेऊन निसर्ग हॉटेलात चहा पिण्यासाठी गेले. सरांना पाहताच राजू काही बाहेर येईना. मालक राजूच्या नावाने ओरडत होता, " हे राजू, बघ गिऱ्हाईकला काय पाहिजे विचारून घे " पण राजू काही बाहेर येईना, मालक रागात जोराने बोलल्यावर तो बाहेर आला आणि निळे सरांच्या टेबलावर जाऊन भीत भीत विचारलं, " काय पाहिजे सर ? ...

परीक्षेचे दिवस

परीक्षेचे दिवस आज शाळेतील मुले शेवटचा पेपर संपल्यावर एकच कल्ला केले आणि शाळेला सुट्या लागल्या म्हणून उड्या मारत मारत घरी गेले. अजून एक मे म्हणजे महाराष्ट्र दिनाचा झेंडा फडकविण्याचा दिवस येण्यास 20-25 दिवस शिल्लक होते. पण मुलांच्या परीक्षा संपल्या आणि त्यांना सुट्या लागल्या या आवेशात मुले नाचत गेली. मुलांना जरी सुट्या लागल्या असल्या तरी शिक्षकांना एक मे पर्यंत सुटका नव्हती. काही काळ लोटला असेल तोच केंद्रप्रमुख साहेबांचा व्हाट्सअप्प वर एक पत्र येऊन धडकलं, त्यात लिहिलं होतं की, परीक्षा संपली असली तरी मुलांना रोज एक-दोन तास अध्यापन करायचे आणि शालेय पोषण आहार देऊन सुट्टी द्यायची. गुरुजीला तसा प्रश्न पडला की आत्ता काय करायचे ? पोरं तर सारी गेली. गुरुजींच्या चेहऱ्यावर प्रश्नार्थक चिन्ह खूप वेळापर्यंत तसंच दिसत होतं. काय करावं कळेना ? एका मुलास बोलावून त्याला सांगितले की, उद्या शाळेत मिठाई वाटप होणार आहे, सर्वाना या म्हणावं. एवढं सांगून गुरुजी निघाले आपल्या घराकडं आणि तो मुलगा गेला गावात सर्वाना ही गोड बातमी देण्यास. त्याने जवळपास सर्व मुलांना सांगितली तरी ही काही मुलं गावसोडून गेली होतीच. दुस...

मायेची ओढ

मायेची ओढ कमला दहा वर्षाची पोर. तिला घरातील लोकांसोबत इतर गोष्टीवर देखील खूप प्रेम होतं. तिचे वडील शेतकरी होते तर आई सुद्धा वडिलांसोबत शेतात काम करत असे. तिला एक छोटा भाऊ देखील होता. या सर्वांसोबत घरात एक चार-पाच कोंबड्या, मांजर, कुत्रा, गाय, बैल असे प्राणी देखील होते. त्या सर्व प्राण्यांवर कमलाचा खूप जीव होता. विशेष करून हंमा गायीवर तिचे खूप प्रेम होते. कारण हंमा ही तिची दुसरी आईच होती. जेंव्हा तिचा जन्म झाला होता. तेंव्हा हंमा घरात आली होती आपल्या लहान पिलासह. कारण ही तसेच होते. कमलाच्या जन्मावेळी तिची आई खूपच आजारी असायची त्यामुळे कमलाचे पोट भरत नसे. तिची दुधाची तहान भागावी म्हणून बाबाने हंमाला घेऊन आले होते. हंमा घरात आल्यापासून कमलाचे रडणे देखील थांबले. ती आजही रोज हंमाचे एक ग्लास दूध पिल्याशिवाय शाळेला जात नाही. तिचा आणि हंमाचा असा जुना संबंध होता. कमला चौथ्या वर्गात शिकत होती आणि हुशार देखील होती. ती शाळेला जातांना सर्वाना बाय करून जात होती. ती शाळेला गेल्यानंतर तिचे आई-बाबा शेताला जात असत. कुत्रा घराची रखवाली करत घरी थांबत असे आणि बैलगाडी सोबत गायीला बांधून ते शेताला जात असत. ...

इमानदार मोती

इमानदार मोती आज गावात गंगाराम आणि त्याच्या इमानदार कुत्र्यांचीच जो तो चर्चा करत होते. कुत्र्याच्या मरणाच्या दिवशी त्याच्या इमानदारीची चर्चा चालू होती. प्रत्यक्ष जीवनात मानवाचे सुद्धा असेच होते नाही का ? अंत्ययात्रेत जाणारे लोकं मेलेल्या माणसाच्या भल्या बुऱ्या गोष्टीवरच तर बोलताना दिसून येतात. अगदी तशीच चर्चा आज मोत्या या कुत्र्याची चालू होती. त्याची एक ही वाईट सवय नव्हती म्हणून तर जो तो त्याची चांगल्या गुणांची चर्चा करीत होते. मोत्या खूप प्रामाणिक, इमानदार आणि विश्वासू होता. त्याने कधी कुणाला त्रास दिला नाही. कुणाच्या घरात जाऊन भाकर चोरली नाही. गंगारामवर त्याचा लई जीव होता म्हणून तर त्याच्या तेराव्या दिवशी तो ही गेला त्याच्याजवळ. मालक नाही म्हणून तो तेरा दिवस काहीच खाल्ला नाही आणि बरोबर तेराव्यालाच गेला. असे तेरवीला आलेले बरेच लोकं बोलत होती. कुत्र्याचं तरी काय भाग्य बघा त्याच्या अंत्यविधीला मालकांएवढे लोकं जमली होती. सर्व लोकांसमोर त्याने आपला प्राण सोडला. तेरवीला जमलेले सर्व मंडळी त्याचे अंतिम संस्कार करूनच पुढच्या कामाला लागले. गंगाराम हा एक अल्प भू धारक शेतकरी. त्याच्याकडे फारच कम...

काम करण्यात लाज कसली

काम करण्यात लाज कसली कोरोना विषाणूने चीनमध्ये धुमाकूळ घालून सर्व जगात आपलं अस्तित्व दाखवायला सुरुवात केली. तसा तो भारतात देखील अवतरला आणि संपूर्ण भारत लॉकडाऊनमध्ये गेलं. कारखाने बंद झाली, उद्योगधंदे बंद झाली, बऱ्याच जणांना नोकरीला मुकावे लागले. पुण्या मुंबईतील काम करून पोट भरणारी सर्व मंडळी आपापल्या गावी परतू लागले. याच कचाट्यात सापडलेला रमेश देखील होता. लॉकडाऊन होण्यापूर्वी तो मुलगी पाहण्यासाठी म्हणून गावाकडे आला होता. रमेश पुण्यात एका कंपनीत काम करत होता, त्याला वीस-पंचवीस हजार रुपयांचा पगार होता. त्यामुळे चांगलं स्थळ चालून आलं म्हणून घरातले सारेचजण मुलगी पाहण्याचा कार्यक्रम ठेवल्याचे कळविले होते म्हणून तो दहा दिवसापूर्वीच गावी आला होता. मुलगी पाहणे झाले, मुलगी त्याला पसंद आली होती आणि दुसऱ्या दिवशी परत तो पुण्याला जाणार होता. पण सरकारने लॉकडाऊन घोषित केले, वाहतुकीचे सारेच मार्ग बंद झाले होते. त्याचे पुण्याला जाणे अवघड बनले आणि तो गावातच अडकून बसला. रमेशची आई त्याला म्हणाली, " लेका, नोकरीपेक्षा जीव वाचविणे महत्वाचे आहे, ही महामारी संपेपर्यंत पुण्याला जाऊ नको, येथेच राहा." ...

अनुभव हेच शिक्षण

Image
••••••••••••••••••••••••••••      अनुभव हेच शिक्षण •••••••••••••••••••••••••••• चार वाजता शाळेची घंटा वाजली. शाळा सुटली तसे सारे मुले एकच कल्लोळ करीत बाहेर पडली. पाहता पाहता किलबिल किलबिल आवाजाने गजबजलेला शाळा परिसर एकदम शांत झाला. वरच्या वर्गातील एक-दोन मुले शिक्षकांस वर्ग बंद करण्यात मदत करीत होती. शाळेच्या व्हरांड्यात दुसऱ्या वर्गातील मुलगी आपले दप्तर उघडून बसली होती. गुरुजीला आश्चर्य वाटले की ही मुलगी शाळा सुटल्यावर घरी न जाता इथे का बसली असेल ? न राहवता तिला विचारले की, " तू घरी जाणार नाही काय ..? " ती पुस्तकात डोके ठेवून म्हणाली, " जाते ना,  थोडं वेळ थांबुन " तिच्या गुरुजींनी दिलेला अभ्यास ती व्हरांड्यात बसून करत होती. कदाचित घरी गेल्यावर विसरते की काय म्हणून ती अभ्यास करत बसली होती. गुरुजी ती घरी का जात नाही म्हणून प्रश्न विचारला.  "  कसे काय... ? " यावर तिने उत्तर देतांना म्हणाली,  " घरी कोणीच नाहीत....." हे उत्तर ऐकून गुरुजींना जरासे आश्चर्य वाटले म्हणून दुसरा प्रश्न विचारला,  " आई बाबा कुठे गेलेत....? "या प्रश्नाला...

paach rupaye

Image
लघुकथा - पाच रुपये आभाळ गच्च भरून आलं म्हणून रेल्वे स्टेशनला जाण्याच्या घाईत तो ऑटो पाहू लागला. पावसाच्या धास्तीने प्रत्येकजण मिळेल त्या ऑटोमध्ये बसून जात होते थोड्याच वेळांत त्याला देखील ऑटो मिळालं. तसं तो रेल्वे स्टेशनला चला म्हणून ऑटोमध्ये बसून घेतलं. ऑटोत बसल्याबरोबर जोराचा पाऊस सुरू झाला. ऑटोमध्ये बसून देखील त्याच्या अंगावर पावसाचे पाणी पडतच होतं. पाऊस तसं खूप जोरदार पडत होता. काही वेळात तो रेल्वे स्टेशनवर पोहोचला. जोरात पाऊस चालूच होता पण ऑटो मधून उतरणे गरजेचे होते. सोबत छत्री नव्हतं आणि पावसात भिजत स्टेशनमध्ये जाण्याशिवाय पर्याय देखील नव्हता. ऑटोमधून उतरून धावत-पळत पावसात भिजत कसेबसे स्टेशनमध्ये पोहोचला. पाऊस मोठा असल्याने एका मिनिटात पावसाने त्याला ओलेचिंब करून टाकले होते. टिकीट काढून प्लॅटफॉर्मवर रेल्वे येण्याची वाट पाहू लागला. पूर्ण अंग भिजल्याने त्याला थंडी वाजू लागली होती. एक गरम चहा प्यावे म्हणून तो कँटीन शोधू लागला. त्याला जास्त वेळ शोधावं लागलं नाही. थोड्याच अंतरावर त्याला कँटीन दृष्टीस पडली. तसा तो कँटीन जवळ गेला आणि चहा पिण्याच्या अगोदर काही खाऊन घ्यावं म्ह...

kashtachi kamai

Image
कष्टाची कमाई गणपत आणि श्रीपत हे दोघे जिवलग आणि लंगोटी मित्र. लहानपणापासून ते एकाच शाळेत शिकले आणि एकत्र वाढले. मात्र आज गणपत आपल्याच गावात शेती करून आपले घर चालवितो तर श्रीपत मोठ्या शहरात मोठ्या बंगल्यात राहून ऐशोरामचे जीवन जगतो. शाळेत शिकत असतांना दोघे ही फार हुशार नव्हते, पण अगदी ढ देखील नव्हते. गणपतचा स्वभाव अगदी भोळा आणि सहकारी वृत्तीचा तर श्रीपत मात्र खूपच चलाखी करायचा, बढाया मारण्यात हुशार आणि लबाडीमध्ये तर त्याचा कोणी हात धरू शकत नव्हते. त्याची तीच चलाखी आणि लबाड बोलण्याची वृत्ती त्याला त्या पदापर्यंत नेली तर गणपतच्या भोळ्या स्वभावामुळे तो गावी शेतातच राबत राहिला. श्रीपतने अनेक वेळा त्याला समजावून सांगितलं की, ' माझ्यासोबत शहरात चल, एका वर्षात बघ कसा मालामाल करतो, काय पडलंय या शेतात.' तेंव्हा गणपत म्हणायचा, ' नको तुझा बंगला, नको तुझी गाडी, मी इथेच खूप आनंदात आणि मजेत आहे. मला देवाने काय कमी केलंय, रोजचे दोन घास खायला मिळतात, राहायला घर आहे आणि काम करायला शेती आहे. अजून काय पाहिजे ? माणसाने जास्तीच्या पैश्याची हाव ठेवू नये, पॆसा माणसाला झोपू ही देत नाही आ...