Posts

Showing posts from November, 2023

मेहनतीचे फळ ( Value of Hardwork )

Image
        लघुकथा - मेहनतीचे फळ दिवाळीच्या सुट्टी निमित्ताने सुरेश गावी जाण्यास निघाला होता. सकाळीच पुण्यावरून आलेल्या बसने तो उतरला आणि गावाकडून येणाऱ्या व्यक्तीची वाट बघत बसस्थानकावर थांबला होता. त्याच बस स्थानकावर थोड्या अंतरावर एक व्यक्ती आपल्या सामानसह उभा असलेला सुरेशने पाहिलं आणि ती व्यक्ती त्याला ओळखीची वाटत होती. म्हणून तो जास्तच निरखून पाहू लागला. थोड्या वेळाने त्या व्यक्तीची नजर देखील सुरेशवर पडली आणि दोघांची नजरानजर झाली. क्षणाचा विलंब न लावता सुरेशने " मनोज, ए मनोज, तू मनोज आहेस ना ! " असे म्हणाला. त्यावर पुढील व्यक्ती देखील, " होय मी मनोज आहे, तू सुरेश ना ! " सुरेश ने देखील प्रत्युत्तरमध्ये होय म्हटलं. त्यांच्या गप्पा झाल्या. ते दोघे एकाच शाळेत शिकलेले, एकाच वर्गातले एकत्र शाळेला ये-जा करणारे आणि एकत्र डबा खाणारे, जिवलग मित्र. त्यामुळे एकमेकांना ओळखण्यात जास्त वेळ गेला नाही. सुरेशने विचारलं, " मनोज सध्या कुठं आहेस ? काय करतोस ?" यावर मनोज म्हणाला, " मी सी आर पी एफ मध्ये आहे आणि तू काय करतोस ? " यावर सुरेश म्हणाला, " मी...

Diwali ( दिवाळी )

Image
दिवाळी     - नासा येवतीकर, धर्माबाद घरात लक्ष्मीपूजन करण्याची लगबग सकाळ पासून सुरु झाली होती. आई भल्या पहाटे उठली आणि घरासमोर अंगण स्वच्छ झाडून सडा टाकली तर ताईने खूप छान रांगोळी काढली. बाबा देखील सकाळी लवकरच उठून शेताकडे जाऊन काही झेंडूची फुलं आणि आंब्याची डहाळी आणली होती. आम्ही भावंडे अजूनही झोपेतच होतो. शाळेच्या दिवसांत रोज सकाळी लवकर उठून तयार व्हावे लागते म्हणून दिवाळीच्या सुट्टीत मनसोक्त झोप घ्यावी असा मनसुबा असतो पण आई कुठे झोपू देते. तिचे काम सरले की तिचा मोर्चा आमच्याकडे वळला. उठा उठा सकाळ झाली म्हणत ती आम्हांला सर्वाना उठवली. डोळे चोळत चोळत आम्ही सारेजण उठलो. तोंडात ब्रश कोंबलो. लगेच अंघोळीची देखील तयारी झालेली होती. घराच्या मागच्या बाजूला लाकडी चूल होती. त्याच्यावर एका मोठ्या पातेल्यात पाणी गरम करायला ठेवलं होतं. सकाळचा गार वारा अंगाला झोम्बत होता. अश्या थंडीत मस्त गरम पांघरून घेऊन झोपावं वाटतं आणि आईने आंघोळी साठी घाई केलेली अजिबात आवडत नव्हतं. पण नाईलाज होता. आई कोणाचेच ऐकत नसे. सर्व भावंडांना तिने अंगभर उटणे घासले आणि सर्वाना एकदाच आंघोळीसाठी र...

EK Tarikh ..... ( एक तारीख .....)

लघुकथा - एक तारीख शंकर एका सरकारी कार्यालयात कारकून पदावर काम करणारा सामान्य व्यक्ती. गौरी त्याची बायको, साधी आणि भोळी. दिसायला सुंदर जरी नसेल तरी नजरेत भरण्यासारखी तिचे डोळे व नाक अनेकांचे लक्ष आकर्षित करणारी होती. ती ग्रामीण भागातील राहणारी आणि जेमतेम सातवी पास झालेली सोज्वळ आणि मनमिळाऊ स्वभावाची होती. ते दोघेही महादेवाचे खूप मोठे भक्त होते. दर सोमवारी महादेवाच्या नावाने उपवास ठेवत असत. त्यांना गणेश आणि कीर्ती असे दोन लेकरं होते, जे की शंकर-गौरीप्रमाणे सुरेख होते. त्यांचा सुखाचा असा संसार होता. ना कोणाची कटकट ना कोणाची झिकझिक. महिन्याच्या एक तारखेला पगार झाला की शंकर घरी परत येत असताना बायकोसाठी गजरा घ्यायचा, लेकरांसाठी काही तरी खाऊ घ्यायचा आणि स्वतःसाठी औषध म्हणजे दारूची एक बॉटल घ्यायचा. असे फक्त एक तारखेला पगाराच्या दिवशी घडायचं. इतर दिवशी तो घरी काहीच न्यायचा नाही. तसा त्याचा कारकूनचा पगार खूप कमी, त्यात शहरात भाड्याने घर घेऊन राहणं आणि त्यात मुलांना खाजगी शाळा व शिकवणी म्हणजे सारं काही खर्चिक होतं. शिवाय त्याला अन्य कोणताच आधार नव्हता शिवाय पगाराच्या. म्हणून तो महिन्यातून एकदाच ...