Posts

पंगूम लंगयते गिरीम

Image
जागतिक अपंग दिनानिमित्त लघुकथा पंगूम लंगयते गिरीम देवाचिये द्वारीं उभा क्षणभरी ।  तेणें मुक्ति चारी साधियेल्या ॥१॥  हरि मुखें म्हणा हरि मुखें म्हणा।  पुण्याची गणना कोण करी ॥  मंदिराच्या माईकवरून रोज सायंकाळी हरिपाठ सर्वजण ऐकत असत. त्या आवाजात अशी काही जादू होती की, हरिपाठ चालू झाला की सारेचजण ते ऐकण्यात गुंग होऊन जात असत. कारण ही तसेच होते त्याच गावातील विठ्ठल नावाचा एक हरिभक्त रोज सायंकाळी न चुकता हरिपाठाचे गायन करत असतो. गावातील लोकांना त्याचे विशेष कौतुक का वाटत होते तर तो विठ्ठल दोन्ही डोळ्याने आंधळा होता. त्याने कधी शाळेचे तोंड देखील पाहिलं नाही तरी संपूर्ण हरिपाठ अगदी तोंडपाठ म्हणतो. नुसतं हरिपाठच नाही तर अनेक अभंग आणि ओव्या त्याला तोंडपाठ होत्या. त्यामुळे नेहमी तो विठ्ठलाचे गुणगान करण्यात तल्लीन राहत असे. रोज पाच घरी माधुकरी मागून मिळेल ते अन्न खाऊन तो आपला जीवन आनंदात जगत होता. त्याला कोणत्याच गोष्टीची आस नव्हती, मनात कुठला स्वार्थ नव्हता. उद्याच्या जगण्याची त्याला अजिबात काळजी नव्हती. ज्याने जन्म दिला त्याला आपली काळजी आहे, आपण उगीच का काळज...

उन्हाळ्यात काळजी घ्यावी

Image
उन्हाळ्यात घेऊ या काळजी  मागील तीन दिवसांपासून कमाल तापमान वाढत असून सध्या पारा थेट ३८-४० अंशापर्यंत सरकल्याने नागरिकांच्या अंगाची काहिली होत आहे. दुपारी एक वाजेपासून चार वाजेपर्यंत उन्हाचा तीव्र तडाखा जाणवू लागत आहे. त्यामुळे प्रत्येकांनी उन्हात बाहेर न पडता घरात किंवा ज्याठिकाणी सावली आहे अश्या ठिकाणी विश्रांती करणे आवश्यक आहे. अत्यंत आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे अन्यथा घरात थांबलेलेच बरे राहील. कारण अश्या तीव्र उन्हामुळे उष्माघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. उन्हात बाहेर निघताना छत्री, पांढरा रुमाल सोबत असणे आवश्यक आहे. लहान मुलांना शक्यतो बाहेर घेऊन जाणे टाळावे. शाळेत जाणारी मुले 12 च्या आत घरात येतील असे वेळापत्रक तयार करावे. शालेय मुलांनी स्वतः आजारी पडणार नाही याची काळजी जरूर घ्यावी. बाहेर पडताना सोबत थोडे पाणी नेहमी असू द्यावे कारण या वातावरणात आपल्या शरीरातील पाणी कमी त्यामुळे डीहायड्रेशन होण्याची शक्यता असते. त्याचसोबत जास्तीत जास्त पाणी पीत राहावे. या काळात शक्यतो फ्रीजमधील पाणी पिणे टाळावे. त्यापेक्षा नैसर्गिक थंड पाणी करून पाणी पीत राहावे. दुपारच्य...

बेरंग होळी Berang Holi

Image
(बे) रंगपंचमी होळीचा सण आबालापासून वृद्धांपर्यंत सर्वानाच आवडणारा सण. सायंकाळी होळी करायची आणि दुसऱ्या दिवशी सकाळी धुलीवंदन म्हणजे एकमेकांना रंग लावणे, त्यालाच रंगपंचमी असे देखील म्हटले जाते. हा रंगाचा खेळ विशेष करून लहान मुलांना खूपच आवडते. मराठी व हिंदी चित्रपटात देखील या सणाला विशेष असे महत्व आहे. शोले चित्रपटातील गब्बरसिंगच्या भारदस्त आवाजातील " कब है होली ? " हे डॉयलॉग रसिक अजूनही विसरू शकत नाही. तसेच सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्या आवाजातील रंग बरसे भिगे चुनरवाली रंग बरसे हे गाणे होळीच्या दिवशी हमखास ऐकायला मिळते. प्रत्येकांच्या घरात या दिवशी आनंदाचे वातावरण असते. प्रत्येकजण निळ्या, पिवळ्या, लाल गुलाबी रंगाने रंगून गेलेला असतो. घरातील व्यक्तीच ओळखणार नाही अशी अवस्था घरातल्या बालकांची होत असते.  अश्या या आनंदीमय वातावरणात रमेशच्या घरात मात्र नीरव शांतता होती. घरात कोणी कोणाला बोलत नव्हते. पीन ड्रॉप सायलेंट होतं. टीव्हीचा आवाज नव्हता की मोबाईलचा आवाज. रमेश पलंगावर आडवा पडला होता आणि त्याची नजर खिडकीतून बाहेर रंग खेळणाऱ्या मुलांवर स्थिरावली होती. मी देखील आज त्य...

आत्मनिर्भर

Image
कथा - आत्मनिर्भर आपल्या कादंबरीची नायिका आहे सुधा, जिच्या जीवनात अनेक चढ उतार आले तरी ती त्या सर्व संकटांना धैर्याने तोंड देऊन सामना केला. तिने स्वतः च्या पायावर उभे राहून आत्मनिर्भरपणे जीवन जगण्याचा जो साहस दाखविला तसा साहस प्रत्येक महिलेने दाखविला पाहिजे. महिलांनी आता आत्मनिर्भर होऊन जगणे आवश्यक आहे. पन्नास टक्के राखीव जागा मिळून ही महिलांना म्हणावी तशी प्रतिष्ठा व मानसन्मान मिळतच नाही. कारण महिलांनी अजूनही स्वतःच्या प्रतिभेला ओळखले नाही. म्हणून प्रत्येक महिलांनी स्वतःच्या प्रतिभा ओळखून जीवन जगण्याचा प्रयत्न करायला हवे आणि आत्मनिर्भर होऊन जगायला हवं, असा छोटा संदेश या कादंबरीतून देण्याचा प्रयत्न केला आहे.  •••••••••••••••••••••••••••••••••••••• भाग - पहिला :  सुधाचे बालपण डोंगराच्या पायथ्याशी वसलेले हरिपूर नावाच्या गावात माधव आणि सविता मोलमजुरी करून सुखी जीवन जगत होते. त्यांना सुधा नावाची चुणचुणीत मुलगी होती. सुधा दिसायला सुंदर, बोलायला चतुर आणि अभ्यासात हुशार मुलगी होती. माधव हा विठ्ठलाचा परमभक्त होता. सकाळ - सायंकाळ नित्यनेमाने हरिपाठ करायचा. त्याची पत्नी सविता...

शंकराची भक्ती

Image
एका गावात एक गरीब व्यक्ती राहत होता. तो शंकराचा खूप मोठा भक्त होता म्हणून त्याला सारेजण शिवभक्त महादेव याच नावाने हाक मारत असत. त्याला नंदा नावाची एक बायको होती. ती रोज या शिवभक्ताला शिव्या देत असे. कारण ही तसेच होते, शंकराच्या भक्तीशिवाय तो अन्य कोणतेच काम करायचं नाही. त्याची बायको रागात येऊन रोज ओरडत बसायची " मी एकटीच काम करू का ? संसार करायचं असेल तर काही काम बीम करावं लागेल की नुसतं ओम नम: शिवाय म्हटलं की पोट भरते का ?" तिच्या बोलण्याकडे महादेव मात्र दुर्लक्ष करायचा. त्याचे नित्य एकच काम असायचे, रोज सकाळी लवकर उठायचं आणि शिवमंदीर समोरील जागा झाडून स्वच्छ करायचे. त्यानंतर पाणी शिंपडायचे. मग घरी येऊन स्नान करायचे आणि कळशीत पाणी घेऊन मंदीराकडे निघायचं. महादेवाच्या पिंडाला स्वच्छ पाण्याने अभिषेक घालायचा, तोंडाने ओम नम: शिवाय जप चालू ठेवायचा, तेल वाती टाकून दिवा लावायचा, घमघमाट असलेली अगरबत्ती लावायचा. चालुक्य घराण्यात बांधलेली हेमाडपंथी मंदीर होती, खूपच आकर्षक आणि सुंदर होती. महादेव देखील त्या मंदिराची अगदी उत्तमरीत्या देखभाल करत होता. म्हणून तर मंदीर आणि त्याचा प...

P T Nisha

पी टी निशा राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धेत प्रथम आलेल्या पी टी निशाचे पोलीस उपनिरीक्षक पदी निवड ही ठळक बातमी वाचून ठाकूर सरांना खूप आनंद झाला. त्यांच्या डोळ्यातून आनंदाचे दोन अश्रू नकळत टपकले. या बातमीने त्यांना  दहा पंधरा वर्षांपूर्वीचा काळ आठवला. ज्यावेळी ते एका प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून काम करत होते. निशा त्यावेळी चौथ्या वर्गात होती. काळी सावळी, वर्गाच्या मानाने जराशी उंच आणि सडपातळ शरीरयष्टी असलेली मुलगी म्हणजे निशा. घरची परिस्थिती खूपच बेताची. आई-वडील दोघे ही शेतात मजुरी करायचे आणि घरातील चार लेकरांची पोटे भरायची. त्यात निशा दुसऱ्या क्रमांकावरची मुलगी. पायात चप्पल नको ना अंगावर चांगले कपडे अशी तिची विदारक स्थिती होती. ती अभ्यासात जेमतेमच होती कारण बहुतांशवेळा काही ना काही कारणाने ती शाळेला डुम्मा मारत होती. एके दिवशी ठाकूर सरांनी दुपारच्या वेळी खेळ घ्यावे म्हणून सर्व मुलांना मैदानात घेऊन गेले. रनिंग या खेळाने सुरुवात झाली. निशाची रनिंग पाहून ठाकूर सर अचंबित झाले. कारण ती वाऱ्याच्या वेगाने धावत होती. तिच्या पायात चप्पल नव्हते ना बूट, जमिनीत दगड,गोटे, काटे चुभतील याची तिला अजिबा...

लघुकथा - संशयाचा बळी

संशयाचा बळी राजाने घरातल्या पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली ही बातमी गावात पसरायला वेळ लागली नाही. राजा आणि अनुसया आपल्या दोन लेकरासह गावाजवळच्या शहरात किरयाच्या खोलीत राहत होते. त्यांच्या दोघात काही वाद झाला नाही, ते गुण्या गोविंदाने राहत होते तरी राजाने आत्महत्या का केली ? याबाबत संपूर्ण गावकरी हैराण झाले होते. पाच वर्षांपूर्वी राजाराम आणि अनुसया यांचं लग्न झालं होतं तो लग्न नसून लव्ह मॅरेज होतं असे म्हटले तरी काही चुकीचे नव्हते. राजाराम शहरातल्या किराणा दुकानात काम करत होता. तर त्याच्याच शेजारी राहणारी अनुसया नुकतीच बारावीची परीक्षा पास होऊन शहरातील कॉलेजमध्ये पदवीला प्रवेश घेतली होती. अनुसया दिसायला खूप सुंदर होती. तसेच आठराव्या आणि एकोणिसाव्या वर्षात तर ती अजूनच सुंदर दिसू लागली. तशी राजाराम रोज तिच्याकडे टक लावून पाहत असे. राजा सायकलवर शहरात जायचा तर अनुसया बसने जायची. मधल्या सुट्टीत राजा कॉलेजमध्ये चक्कर मारायचा, ती दृष्टीस पडेपर्यंत थांबायचा, दोघांची नजरानजर झाली की मग परत आपल्या कामावर जायचा. एकदा कॉलेजमधील काही टवाळकी पोरं अनुसयाला सतावीत असताना राजाने सोडवणूक केली मग का...