Posts

Showing posts from February, 2025

देविदास नारमोड ( Devidas Narmod )

Image
कर्तव्याशी प्रामाणिक असलेले देविदास नारमोड प्रत्येक सरकारी कर्मचाऱ्यांच्या जीवनात सेवानिवृत्तीचा दिवस येतोच येतो. नियत वयोमानानुसार 58 वर्षे पूर्ण झाल्यानंतर सेवेतून कार्यमुक्त होणे प्रत्येक कर्मचाऱ्यांना गरजेचे असते. त्याच नियमानुसार आज पंचायत समिती उमरी येथील सिंधी बिट चे शिक्षण विस्तार अधिकारी देविदास नारमोड हे आपल्या वयाची 58 वर्षे पूर्ण केल्यामुळे सेवानिवृत्त होत आहेत. त्यानिमित्ताने त्यांच्या शैक्षणिक कार्याचा थोडक्यात आढावा.  धर्माबाद तालुक्यातील गोदावरी नदीच्या काठावर वसलेल्या पाटोदा खु. येथे देविदास नारमोड यांचा जन्म 07 फेब्रुवारी 1967 रोजी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव गणपतराव तर आईचे नाव गंगाबाई असे आहे. त्यांच्या घरची परिस्थिती अत्यंत बिकट होती. आई-वडील शेती काम करत होते. त्यांचे पहिली ते चौथीपर्यंतचे प्राथमिक शिक्षण गावातील शाळेत पूर्ण झाले. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी ते बिलोलीच्या आत्याबाईकडे राहून पाचवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण जिल्हा परिषद हायस्कुल बिलोली येथे पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी शिक्षणशास्त्र पदविका म्हणजे डी. एड. शिकण्याचा निर्णय घेतला. धर्माबाद...

कादंबरी - लक्ष्मी

Image
कादंबरी - लक्ष्मी प्रस्तावना -  कोरोना विषाणूने जगभर थैमान घातलेला असताना इथे घरात बसून मनाची ही घालमेल चालू झाली होती. सुरुवातीला काही दिवस आनंदात गेले पण लॉकडाऊनचा काळ वाढू लागला तसा मनाची बेचैनी देखील वाढू लागली. दिवसभर घरात बसून काय करावं ? या प्रश्नाचे उत्तर शोधताना अनेक पर्याय डोळ्यासमोर उभे होते. टीव्ही पाहणे, चित्रपट पाहणे, गाणी ऐकणे, जुन्या संग्रहातील फोटो अल्बम पाहणे, फोनवर गप्पा मारणे आणि पुस्तकाचे वाचन-लेखन करणे. अश्या अनेक पर्यायातून पुस्तक वाचण्याचा पर्याय निवडला. जून महिन्यात लक्ष्मीबाई टिळक लिखित स्मृतिचित्रे हे साडे पाचशे पानांचे पुस्तक रोज थोडे थोडे वाचून पूर्ण केलो. या पुस्तकातील नारायण वामन टिळक यांची पत्नी लक्ष्मीबाई ही लग्नाच्या वेळी निरक्षर होती. पण नारायणराव यांनी तिला साक्षर केले, नुसते साक्षर केले नाही तर तिच्या हातून साहित्य निर्मिती करून घेतली. याच लक्ष्मीबाईचा प्रभाव माझ्यावर पडला आणि मला एक कथा बीज सापडले. मुलींच्या शिक्षणाचे महत्त्व समाजाला कथेच्या माध्यमातून सांगावं तसेच या लॉकडाऊन काळातील वेळेचा सदुपयोग व्हावा म्हणून दिनांक 01 जुलै रोजी...