स्वचतेचा वसा
*नाटक - स्वच्छतेचा वसा*
लेखक - नासा येवतीकर
" हाय राम्या, कसं हायेस तू ? "
" हाय सोम्या, मी मजेत हाय आणि तू.. "
" म्या भी.."
" लय दिसं झाले कुठं गेलं होतास तू ? दिसलाच नाहीस.."
" मी गेलोतो मामाचा गावाला..."
" बरं, अजून काय चाललंय मग.."
" काय नाय, मामाच्या गावात ते काही तरी संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान चालू हाय.."
" म्हणजे ? काय राहते त्यात ? "
" म्हणजे बघ, गावात कोठे ही घाण करायचं नाही, सगळीकडे स्वच्छता ठेवायची.."
" तसं तर आम्ही भी स्वच्छ ठेवतोच की.."
" तसं नाही रं, घराच्या आजूबाजूला स्वच्छता, रस्त्यावर स्वच्छता, आणि सर्वात महत्वाचे म्हणजे बघ उघड्यावर संडास करायचे नाही."
" मग कोठे करायचं ? घरात करायचं का ? "
" होय, घरातच करायचं ..!"
" ऑ.....! घरात करायचं ....!"
" होय, घरातच करायचं ..!"
" हे राम्या, तुझं डोस्कं बिस्कं फिरलं की काय ? सकाळी सकाळी कोण भेटले नाही काय ?"
"सोम्या, बघ, माझे बोलणे पूर्ण ऐकून घे, सरकार म्हणते घरोघरी संडासरूम बांधून घ्या आणि त्याचा नियमित वापर करा. सरकार त्यासाठी पैसे भी देते. आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी भी म्हणतात परिसर स्वच्छ रहेगा तो मन भी स्वच्छ रहेगा."
" चल आता चालतो, मला लई काम हाईत. भेटूत संध्याकाळी आपल्या अड्ड्यावर... बाय"
राम्या जातो अन तिकडून शाम्या येतो
" काय सोम्या, लई काळजीत दिसतुया, काय झालं ?
राम्या ने बोललेल्या गोष्टी तो सांगतो त्यावर
" असं व्हय, मला भी माहीत नाही सायंकाळी त्याला विचारू या, अजून काही कळते काय पाहू"
सायंकाळी तिघे ही भेटतात
"राम्या, खरंच तू सकाळी बोलले खरं हाय की ?."
" तुझ्या शपथ सोम्या सर्व खरं आहे. "
" तुला आठवते काय ? शाळेत आपण दोघे शिकताना गुरुजी काय सांगत होते ? उघड्यावर संडास केल्याने गावात सर्वाना त्याचा त्रास होतो."
" व्हय गेल्यावर्षी गावातल्या लोकांना हगवण लागली होती. बापरे अख्खा गाव सरकारी दवाखान्यात ऍडमिट होती."
"घाणीमुळे मच्छर वाढतात, ते चावले तर आपणास हिवताप येते तर कधी कधी डेंग्यू भी होतो."
"व्हय दोन वर्षाखाली आपल्या गावात चिकन गुणिया रोगाने किती बेजार होते , आज ही लोकांना त्याचा त्रास होतो."
" पण... मला एक सांग, संडासरूम बांधले की सर्व घाण दूर होते काय ? नाही ना ..."
" तसं नाही सोम्या, घाणीची सुरुवातच या कार्यक्रमाने होते म्हणून त्याला अगोदर बंद करणे आवश्यक आहे."
" संत गाडगेबाबा हे स्वच्छतेचे प्रसारक होते, त्यांनी म्हटले आहे की, ज्या गावात स्वच्छता राहते तेथे लक्ष्मी आणि सरस्वती नांदते"
" म्हणजे काय मला कळले नाही ?"
" म्हणजे आपला पैसा वाचते, आरोग्य चांगले राहिले की अभ्यास चांगला होतो आणि यश मिळते. म्हणून आपण सर्व स्वच्छ राहणे आवश्यक आहे"
" होय मित्रा, चला आज आपण स्वच्छ राहण्याचा वसा घेऊ आणि इतरांना पण सांगू या.
" शौचालय बांधू या घरोघरी "
" स्वच्छतेचा मंत्र देऊ दारोदारी "
- नागोराव सा. येवतीकर
मु. येवती ता. धर्माबाद
Comments
Post a Comment