जिद्द
जिद्द प्रकाश हा अभ्यासू, कष्टाळू आणि जिद्दी तरुण. जीवनात त्याने अनेक कष्ट, यातना आणि संकटांना तोंड दिले पण हार पत्करली नाही. तो लहान असतांनाच त्याचे वडील त्याला सोडून देवाघरी गेले. त्यावेळी प्रकाशला काही कळत देखील नव्हते. छोट्याशा गावात तो आईसोबत राहत होता. शेती तर नव्हतीच होतं एक घर ते ही झोपडीच. आई दुसऱ्याच्या शेतीत मोलमजुरी करून कसेबसे दिवस काढत असे. प्रकाश शाळेला जाऊ लागला, त्याची हुशारी आणि कष्टाळूवृत्ती शाळेच्या अभ्यासात दिसून येऊ लागली. एकेक वर्ष संपत जात होते. वर्ग वाढत होते तसे त्याच्या समोर अनेक संकटे उभे राहू लागले. गावात सातवी पर्यंतची शाळा होती तोपर्यंत शिक्षण घेणे सोपे गेले मात्र आठव्या वर्गाचे शिक्षण घेण्यासाठी त्याला गावापासून दूर जाणे आवश्यक होते. पाच किमी दूरच्या शाळेत त्याला चालत जाण्याशिवाय पर्याय नव्हता. सायकल विकत घेण्याइतके त्याच्याजवळ पैसे देखील नव्हते. तरी ही तो रोज न चुकता शाळेला जाऊ लागला. रोज पाच किमी जाणे आणि येणे असे दहा किमी तो चालायचा. प्रकाशला आता काही गोष्टीची जाणीव देखील होऊ लागली. आई ज्या शेतात कामाला जाते तेथे सुट्टीच्या दिवशी तो ही जाऊ लागला. त्याम...