बहिणीची शपथ
बहिणीची शपथ तारा आज दवाखान्यात मृत्यूशी झुंज देत होती आणि तिचा भाऊ मोहन हतबल होऊन तिच्या शरीराकडे पाहत उभा होता. दोनच दिवसापूर्वी ताराचे संपूर्ण शरीर भाजले होते, स्वयंपाक करतांना गॅसचा भडका उठला आणि तिचे शरीर जळाले असे तिच्या सासरचे म्हणणे होते पण सत्य काही वेगळेच होते. मोहनला सारे सत्य माहीत होते पण तारामूळे तो काही बोलू शकत नव्हता. तिने एक दोनदा सासरच्या लोकांनी तिचा कसा छळकरत आहेत हे बोलून दाखविले होते पण त्याबाबतीत मोहन ला देखील काही करता येत नव्हते. ताराच्या नवऱ्याला ऑटोमोबाईलचे दुकान टाकायचे होते आणि त्यासाठी पाच लाख रुपयांची गरज होती. ताराने आपल्या भावाकडून ते पैसे आणावेत अशी त्यांची मागणी होती आणि त्याच कारणावरून तिला रोज त्रास दिला जात असे. मोहन एका कंपनीमध्ये नोकरी करायचा त्यामुळे त्याच्याकडे देखील तेवढे पैसे नव्हते तो तरी कुठून आणणार ? हे ताराला माहीत होतं, त्यामुळे ती कधी त्याला पैसे मागितली नव्हती. पण अचानक एके दिवशी मोहन जेंव्हा तिच्या सासरी गेला होता, त्याला जे दृश्य दिसले ते पाहून तो हबकून गेला. तारा आपल्या खोलीत रडत बसली होती आणि मोहन अचानक तेथे गेला. ताराला त्...