वाऱ्याची मुलगी
....... वाऱ्याची मुलगी राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धेत प्रथम आलेल्या पी टी निशाचे पोलीस उपनिरीक्षक पदी निवड ही ठळक बातमी वाचून ठाकूर सरांना खूप आनंद झाला. त्यांच्या डोळ्यातून आनंदाचे अश्रू नकळत टपकले. या बातमीने त्यांना दहा पंधरा वर्षांपूर्वीचा काळ आठवला. ज्यावेळी ते एका प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून काम करत होते. निशा त्यावेळी चौथ्या वर्गात होती. काळी सावळी, वर्गाच्या मानाने जराशी उंच आणि सडपातळ शरीरयष्टी असलेली मुलगी म्हणजे निशा. घरची परिस्थिती खूपच बेताची. आई-वडील दोघेही मोलमजुरी करून चार लेकरांची पोटे भरायची. त्यात निशा दुसऱ्या क्रमांकाची. पायात चप्पल नको ना अंगावर चांगले कपडे, अशी तिची विदारक स्थिती होती. ती अभ्यासात जेमतेम होती. कारण काही ना काही कारणाने ती शाळेला येऊ शकत नसे. एके दिवशी ठाकूर सरांनी खेळ घेण्याचे ठरविले. सर्व मुलांना मैदानात घेऊन गेले. धावणे या खेळाने सुरुवात झाली. निशाची रनिंग पाहून ठाकूर सर अचंबित झाले. कारण ती वाऱ्याच्या वेगाने धावत होती. तिच्या पायात चप्पल नव्हते ना बूट, जमिनीत दगड, गोटे, काटे टोचतील याची तिला अजिबात पर्वा नव्हती. सरांसोबत ती रोज ...